Lonavala : गणेशोत्सवामध्ये धार्मिक, पौराणिक व प्रबोधनपर देखावे

एमपीसी न्यूज- लोणावळा परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना डेकोरेशन करताना अडचणी येत असल्या तरी काही मंडळांनी मंदिरे उभारत धार्मिक देखावे तर काही ठिकाणी पौराणिक व प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले आहे.

लोणावळा शहरात सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचे प्रतिबिंब य‍ावर्षी गणेश उत्सवात दिसत असून बहुतांश मंडळांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावत स्वच्छतेचा संदेश देण्यावर भर दिला आहे. यासह सुंदर व आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईची परंपरा यावर्षी देखिल लोणावळा शहरात कायम राखण्यात आली आहे. लोणावळा शहरात लहान मोठी 49 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. यापैकी काही प्रमुख मंडळांनी आकर्षक देखावे उभे केले आहेत.

मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 94 वे वर्ष असून, लालबागच्या राजाची आकर्षक व भव्य गणेश मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे. मंडळाच्या वतीने बाप्पांच्या मूर्ती लगत फुलांची आकर्षक सजावट केली आहे. गणेश निकम हे अध्यक्ष आहेत.

मानाचा दुसरा गणपती असलेल्या रायवूड उद्यानातील तरूण मराठा गणेश मंडळाचे हे 87 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी अष्टविनायकाचे दर्शन भाविकांना घडविले आहे. भगवान पांगारे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मानाचा तिसरा गणपती असलेल्या संत रोहिदास मित्र मंडळाचे हे 81 वे वर्ष असून, या वर्षी साधेपणाने उत्सव साजरा केला आहे. देवेंद्र पवार हे मंडळाचे अध्यक्ष आहे.

मानाचा चौथा गणपती असलेल्या गवळीवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 82 वे वर्ष असून, या वर्षी मंडळाने पाण्याचे कारंज बनविले आहे. तसेच मंडळाच्या वतीने स्वच्छतेचे प्रबोधन केले जात आहे. अमित बारसे हे यावर्षीचे अध्यक्ष आहेत.

मानाचा पाचवा गणपती असलेल्या वलवण येथील शेतकरी भजनी मंडळाने उत्सव नेहमीप्रमाणे साधेपणाने साजरा केला आहे. जातिय सलोखा राखण्याकरिता रोज एका समाजाच्या हस्ते आरतीचे आयोजन केले आहे. स्वच्छता प्रबोधनासाठी संदेशपर फलक लावण्यात आले आहेत. रमेश पाळेकर हे यावर्षी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मावळचा राजा अशी ओळख असलेल्या शिवाजी मित्र मंडळाने हे 54 वे वर्ष असून यावेळी मंडळाने वेल्लुर महाल ह्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली असून, प्रकाश चौहान मंडळाचे अध्यक्ष आहे.

वर्धमान सोसायटीतील नेहरू तरूण मंडळाचे हे 48 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी भव्य तिरुमाला तिरुपती मंदिर ही प्रतिकृती साकारली आहे. रोहित ओसवाल हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. शिवाजी चौकातील अखिल महात्मा फुले भाजी मंडई मंडळाचे हे 72 वे वर्ष असून, यावर्षी फुलांची सजावट करत साधेपणाने उत्सव साजरा केला आहे.

नाकोडा काॅम्पलेक्स येथील राणाप्रताप नेताजी मित्र मंडळाचे हे 82 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी श्रावण बाळ व राजा दशरथ हा देखावा साकारला आहे. सुभाष सोनी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

प्रियदर्शनी संकुल जवळील तुफान मित्र मंडळाचे हे 55 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी तुळजापुर येथील भवानी मंदिर ही प्रतिकृती साकारली आहे. संजोग पिसे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मावळा पुतळा येथाल तानाजी युवक मित्र मंडळाचे हे 54 वे वर्ष आहे. मंडळाने यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करत पूरग्रस्तांना मदत केली आहे. आशिष पवार हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

तुंगार्ली येथील ओंकार तरूण मंडळाचे हे 42 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृतीपर देखावा सादर केला आहे. मंडळाचे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम असतात. प्रकाश धनकवडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

प्रियदर्शनी संकूल येथील अष्टविनायक मित्र मंडळाचे हे 41 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी लेजर शो द्वारे प्लास्टिक बंदी, प्रदूषण मुक्ती व आरोग्य विषयक जनजागृती केली असून चंद्रायानाबाबत इस्त्रोचे कौतुक केले आहे. सतीश सोनवणे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

नवयुग मित्र मंडळाचे हे 58 वे वर्ष असून, यावर्षी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. प्रकाश मोरे हे मंडळाचे अध्यक्ष आहे. शिवाजी चौकातील शिवाजी उदय मित्र मंडळाने यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा केला आहे.

महाराष्ट्र मातंग समाज मंडळाचे हे 69 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी फुलांची आकर्षक सजावट केली आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची तयारी, स्वच्छता जनजागृती बाबत पोस्टरबाजी केली आहे. अभय लोंढे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

लोणावळ्याचा लाडका राजा असलेल्या पोस्टमन चाळीतील गजानन व जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे 40 वे वर्ष आहे. मंडळाची लालबागच्या राजाची भव्यमूर्ती आकर्षण ठरत आहे. अंकूश महाडिक हे मंडळाचे अध्यक्ष आहे.

कुसगाव दत्तवाडी येथील श्री. नवनाथ मित्र मंडळाने आकर्षक पुष्प सजावट साकारली असून, मंडळाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. हुडको येथील सह्याद्री मित्र मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

त्याचप्रमाणे श्री साई आझाद मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ भांगरवाडी, जयहिंद मित्र मंडळ नांगरगाव, गणेश मित्र मंडळ भांगरवाडी, नटराज मित्र मंडळ, शिवाजी युवक मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, मातंग समाज मित्र मंडळ यांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे.

तुफान मित्र मंडळ, तुळजापुर येथील भवानी मातेचे मंदिर
तरुण मराठा मित्र मंडळाने घडविलेले अष्टविनायक दर्शन
नेहरु मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेले बालाजी मंदिर
शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेली वेल्लुर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती

 

नवयुग मित्र मंडळ टेबल लँन्ड यांनी तयार केलेले काल्पनिक मंदिर

 

महाराष्ट्र मातंग समाजाची बाप्पांची लक्षवेधी मुर्ती
ओमकार तरुण मंडळ तुंगार्ली , स्वच्छ सर्वेक्षण 2020 हा प्रबोधनपर देखावा
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गवळीवाडा यांनी बनविलेले पाण्याचे कारंजे

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like