Lonavala : रायवूड उद्यानात आयोजित चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शिवसेना लोणावळा शहर विभाग क्रमांक 10 च्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील रायवूड उद्यानात आज ही चित्रकला स्पर्धा व चित्र रंग भरण स्पर्धा घेण्यात आली होती.

शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मावळ तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धे दरम्यान तालुका संघटक अंकुश देशमुख, उपतालुका प्रमुख मदन शेडगे, शिवसंग्राम चे तालुका अध्यक्ष अमित भेगडे, तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, शरदराव हुलावळे , नगरसेविका सिंधुताईं परदेशी, कल्पनाताई आखाडे, अंजलीताई कडू, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, बाळासाहेब कडू, भरत हारपुडे, रज्जाक मणियार, विशाल हुलावळे, तानाजी सुर्यवंशी, दिपाली भिलारे, संगिता कंधारे, मनिषा भांगरे, प्रभा आकोलकर, संतोष येवले आदी मान्यवरांनी भेटी देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख संजय भोईर, शहर संघटक सुभाष डेनकर, युवासेना समन्वयक शाम सुतार, समन्वयक जयवंत दळवी, विभागप्रमुख बाळासाहेब मोहोळ, विभाग संघटक शेखर कारके, उपविभागप्रमुख सचिन गोणते, शाखाप्रमुख सागर भोमे यांनी केले होते.

हनुमान टेकडी येथे आरोग्य शिबिर
हनुमान टेकडी येथे शिवसेना शाखेच्या वतीने गरजु नागरिकांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी करुन गरजुंना मोफत औषधांचे वाटप व काहीच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे शिवसेना अवजड वाहतुक सेनेचे उपतालुका प्रमुख नरेश काळविट यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखिल करण्यात आला.

यावेळी नरेश काळविट यांच्यासह आभित गायकवड, रवी साळसकर,कृष्णा मराठे, शंकर गरवड,आशा कालेकर,संगिता शिंदे,ज्ञानदेव आखाडे, संतोष कुडले, दिपक जायगुडे, सुनिल तिकोने, निलेश वाघमारे , रुपेश गायकवाड,राजेन्द्र धोत्रे ,अविनिश दलवी, दत्ता काळवीट आदी शिवसैनिक उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.