Lonavala : ‘आयएनएस शिवाजी’मध्ये गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस शिवाजी’मध्ये गार्ड ड्युटीवर असलेला जवान आकाश साईनाथ कन्नाल (वय 20, रा. गंगा ब्लाँक, आयएनएस शिवाजी लोणावळा, मूळ राहणार पार्डी, तेलंगणा-राज्य) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकिस आली.

याप्रकरणी मुकेशकुमार राजेंद्र चौधरी (वय 28, रा. गंगा ब्लाँक, आयएनएस शिवाजी, लोणावळा) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.

  • लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कन्नाल हे मंगळवारी रात्री गंगा ब्लाँक येथे गार्ड ड्युटीवर असताना बाथरुमला गेले. मात्र, बराच वेळ परत आले नाहीत. यावेळी गार्ड ड्युटी तपासणी करिता आलेले मुकेशकुमार यांनी चौकशी करत आकाश कोठे गेला? याचा शोध घेतला असता शेजारीच असलेल्या मनोरंजन हाॅलमध्ये पंख्याला पांढर्‍या रंगाच्या बेडशिटने आकाश याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

मुकेशकुमार आणि इतर यांनी हाॅलचा दरवाजा तोडत आकाशला उपचाराकरिता घेऊन गेले मात्र, तो उपचारापूर्वी मयत झाला होता. आकाश यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नसून याप्रकरणाचा अधिकचा तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका मुंडे ह्या करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.