BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : पुणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 45 किलो वजनी गटात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ प्रथम; तर, 35 किलो वजनी गटात क्रांती क्रिडा मंडळ

एमपीसी न्यूज – मावळ तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने लोणावळ्यातील पुरंदरे ग्राउंडवर रविवारी पार पडलेल्या 45 किलो व 35 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत मोठ्या गटात वलवण लोणावळा येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व लहान गटात पिंपळे सौदागर येथील क्रांती क्रिडा मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. पुणे जिल्ह्यातील जवळपास 70 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. रात्री सव्वादहा वाजता अंतिम सामना खेळविण्यात आला.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे व कबड्डी मैदानाचे पुजन करत सकाळी साडेअकरा वाजता सामन्यांना सुरुवात झाली.

यावेळी नगरसेवक निखिल कविश्वर, मावळ फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पारख, मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पाळेकर, कार्याध्यक्ष गणेश काकडे, उपाध्यक्ष मयुर ढोरे व किरण गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश काळे, रुपाली जाधव, जयश्री काळे, राजेंद्र चौहान, प्रमोद खिल्लारे, लोणावळा नगरपरिषद सेवक कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर जाधव, नंदकुमार काळोखे व विजय झेंडे यांच्यासह मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व संचालक व मावळ फाऊंडेशनचे सर्व संचालक उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संघ सकाळपासून पुरंदरे शाळा मैदानावर दाखल झाल्याने सर्व परिसर क्रिडामय झाला होता. अतिशय दर्जेदार व लक्षवेधी सामने लोणावळाकरांना यानिमित्ताने पहायला मिळाले. चार मैदानांवर एकाचवेळी हे सामने सुरु होते. जिल्हा पंच कमिटी व संयोजकांच्या वतीने योग्य नियोजन करुन सामने घेण्यात आले. रात्री नऊ वाजता 35 किलो वजनी गटातील अंतिम सामना क्रांती क्रिडा मंडळ पिंपळे सौदागर व बापुराव जाधव प्रतिष्ठान इंदापुर यांच्यात खेळविण्यात आला.

यामध्ये क्रांती क्रिडा मंडळाने आक्रमक खेळी करत सामना 22 विरुद्ध 13 गुणांच्या फरकाने जिंकला. 45 किलो वजनी गटातील अंतिम सामना हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ वलवण व भैरवनाथ संघ बाणेर यांच्यात रात्री सव्वादहा वाजता झाला. यामध्ये पहिल्याच डावात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने तब्बल 9 गुणांची आघाडी घेतली. दुसरा डाव अटीतटीचा झाला यामध्ये देखिल दोन गुणांची आघाडी घेत 11 गुणांनी सामना जिंकला. हनुमान व्यायाम प्रसारका यांनी 25 तर भैरवनाथ संघाने 14 गुण मिळविले.

माजी नगरसेवक दत्तात्रय येवले, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अँड. विजयराव पाळेकर, मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पाळेकर, उपाध्यक्ष किरण गायकवाड, अँड संजय वांद्रे, मावळ फाऊंडेशनचे बाळासाहेब फाटक, जितेंद्र टेलर, संदीप वर्तक, भरत तिखे, बंडू येवले, रुपाली जाधव, विलास जाधव, शेखर खिल्लारे, अँड शैलेष पडवळ, बापुलाल तारे, रविंद्र साठे, विशाल विकारी, प्रफुल्ल पाळेकर, विनय हवालदार, संतोष चोरडिया यांच्या हस्ते सर्व विजयी संघांना रोख रक्कमेचे बक्षिस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सन्मानचिन्ह कबड्डी असोसिएशनचे संचालक रजनीकांत यंदे यांनी दिले होते. जिल्ह्यांचे पंच प्रमुख गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पंचांनी निकालाचे काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल :
35 किलो वजनी गट : क्रांती क्रिडा मंडळ पिंपळे सौदागर (प्रथम क्रमांक), बापुराव जाधव प्रतिष्ठान इंदापुर (द्वितीय क्रमांक), शिवराय प्रतिष्ठान शेल पिंपळगाव (तृतीय क्रमांक), स्वरुपवर्धिनी पुणे (चतुर्थ).
क्रांती क्रिडा मंडळाचा रोहित तांदळे (अष्टपैलू खेळाडू), शिवराय प्रतिष्ठानचा अविराज थिटे (उत्कृष्ट पकड), बापुराव जाधव प्रतिष्ठानचा ओम दारुडकर

(उत्कृष्ट चढाई) :
45 किलो वजनी गट : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ वलवण (प्रथम क्रमांक), भैरवनाथ संघ बाणेर (द्वितीय क्रमांक), शिवाजी उदय मंडळ चिंचवड (तृतीय क्रमांक), भैरवनाथ संघ भोसरी (चतुर्थ क्रमांक)

भैरवनाथ संघ बाणेरचा अजय शिंदे (अष्टपैलू खेळाडू), हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा ज्ञानदेव चव्हाण (उत्कृष्ट चढाई), शिवाजी उदय मंडळ पुणे यांचा श्रीयश टोणपेकर (उत्कृष्ट पकड)

युवा भैरवनाथ संघ बाणेर यांना उत्कृष्ट संघ हा सन्मान देण्यात आला. मावळ वार्ता फाऊंडेशनच्या वतीने 45 किलो वजनी गटातील प्रथम क्रमांकाला एकविसशे रुपये तर विनय हवालदार यांच्या वतीने भैरवनाथ संघ बाणेर यांना दोन हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like