Lonavala: हनुमान टेकडी दुर्घटना : सुनील शेळके यांच्याकडून आपत्तीग्रस्त दोडके कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील लोणावळा (हनुमान टेकडी) येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन घराची भिंत कोसळल्याने आपत्तीग्रस्त दोडके कुटुंबाला लागेल ती सर्व मदत करण्याची ग्वाही तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी दिली आहे.

लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे सकाळी साडेसात वाजता एक घर कोसळल्याने कुणाल अजय दोडके या (वय 10) वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, कुणालची लहान बहिन नंदिनी (वय 9) ही जखमी झाली.

  • या घटनेची माहिती मिळताच सुनील शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील नागरिकांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. डाॅक्टरांशी चर्चा करून उपचारांची माहिती घेतली. दोडके परिवाराला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही शेळके यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.