BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : हर्षदा कचरे सौभाग्यवती 2019 च्या मानकरी

गुड्डू शेख व दिपाली फाटक ठरल्या भाग्यवान विजेत्या

एमपीसी न्यूज- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी कुलस्वामिनी महिला मंच व महालक्ष्मी महिला मंच यांच्या सहयोगाने लोणावळा शहरात आयोजित केलेल्या सौभाग्यवती 2019 या महिलांच्या गेम शो मध्ये खंडाळा येथील हर्षदा किशोर कचरे यांना सौभाग्यवती 2019 चा किताब मिळाला. त्यांना मानाची पैठणी व 1 तोळा सोन्याचे नाणे भेट देण्यात आले. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक विजया मंदार यांना तर तिसरा क्रमांक सोनाली गायकवाड यांनी पटक‍विला, य‍ासह अंतिम स्पर्धेतील सात जणींना मानाची पैठणी देण्यात आली.

यावेळी उपस्थित महिलांमधून काढण्यात आलेल्या लकी ड्राॅ मध्ये गावठाण येथील गुड्डू शेख ह्या भाग्यवान विजेत्या ठरल्या त्यांना दीड तोळ्याचा नेकसेल भेट देण्यात आला. लकी ड्राॅ मध्ये पूजा मावकर (द्वितीय), साक्षी नलावडे (तृतीय), रमा आखाडे (चतुर्थ), शुभांगी केदारी (पाचवा), सुनीता खिलारे (सहावा), नयना भोसले (सातवा), निर्माला रोकडे (आठवा), रंजना इंगवले (नववा), करिष्मा तुपे (दहावा) या भ‍ाग्यवान ठरल्या तर बचतगट लकी ड्राॅ मध्ये दीपाली फाटक या भाग्यवान ठरल्या. त्यांना 31 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले तर सविता भानुसघरे (द्वितीय), सुनीता रोकडे यांचा (तृतीय) क्रमांक आला.

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, साई उद्योग समूहाचे सुधाकर शेळके, शैलजा फासे, पूजा गायकवाड, आरोही तळेगावकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस समारंभ पार पडला. प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांना हा गेम शो खेळविला तर बापु तारे यांनी सूत्रसंचालन केले.

HB_POST_END_FTR-A2

.