सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Lonavala : दुधीवरे खिंडीत आढळला शीर नसलेला मृतदेह

एमपीसी न्यूज – लोणावळा-पवनानगर रोडवर दुधीवरे खिंडी जवळ रस्त्याच्या बाजूला झाडांमध्ये एक शीर नसलेला मृतदेह आढळला. ही घटना आज (रविवारी) उघडकीस आली. मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे वय अंदाजे 30-35 वर्ष आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या पुरुषाचे शीर कापुन धडावेगळे करून मृतदेह एका गोनपाटाच्या पोत्यात बांधून टाकलेले आढळून आले. मृतदेहाच्या अंगात निळा, आकाशी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेला टीशर्ट तसेच काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट व चॉकलेटी रंगाची अंडरविअर घातलेली आहे. प्रेताचा उजवा पंजावर धारधार शस्त्राने वार केलेले आहेत. लोणावळा आणि परिसरातील पोलीस ठाण्यात या वर्णनाचा व्यक्ती हरवल्याची माहिती मिळवली जात आहे. तसेच विविध बाजूंनी तपास सुरू आहे. या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असेल तर लोणावळा पोलिसांशी (0214-273036) संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news