Lonavala :  शहरात आज दिवसभर जोरदार पाऊस

दिवसभरात 90 मिमी पावसाची नोंद : Heavy rain throughout the day in the city today

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात आज गोकुळ अष्टमीच्या मुर्हतावर दिवसभर जोरदार पाऊस झाला. मंगळवारच्या 24 तासात शहरात 60 मिमी तर बुधवारी दिवसभरात 90 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.

लोणावळा शहर‍ात मंगळवारी दुपारनंतर पावसाला दमदार सुरूवात झाली. दिवसभर पावसाचा जोर व हवा कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते.

दहिहंडी महोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा

गोपाळ काला व दहिहंडीचा महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात व ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने साजरा झाला.

ग्रामीण भागात परंपरेनुसार काही घरांमध्ये देवांचे अस्थाने बसतात, याठिकाणी रात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा व सकाळी दहीहंडीचा महोत्सव साजरा झाला.

गावातील  पारंपारिक पद्धतीने हंडी फोडली. लोणावळा शहरातील मानाची पहिली हंडी देखील मावळ वार्ता फाऊंडेशनच्या सदस्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात फोडत आजचा महोत्सव साध्या पद्घतीने साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.