Lonavala : शहरात गारांसह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज : गेले दोन दिवस वाढलेल्या उष्णतेनंतर अखेर आज ( बुधवारी ) लोणावळा शहरात गारांसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोणावळेकरांना दिलासा मिळाला.

लोणावळ्यात काल (मंगळवारी) पासून दुपारनंतर ढग जमा होत होते. आज दुपारी चार वाजल्यापासून आकाशात काळ्या ढगांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर अचानक गार वारा सुटला होता. यातच साडेपाच वाजता पावसाच्या लहान थेंबासोबत गारा पडू लागल्याने सर्वत्र लहान आकाराच्या गाराच गारा दिसू लागल्या होत्या. क्षणात ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व पावसाच्या धारा लोणावळेकरांना अनुभवायला मिळाल्या.

पावसाच्या दमदार सरींनी वातावरणात काहीसा गारवा आला होता. लहान मुलांनी दारात पावसात भिजण्याचा तसेच गारा गोळा करण्याचा आनंद लुटला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरुवातीला गारा पडल्या व नंतर जोरदार पाऊस झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.