Lonavala : परिसरात होळीचा सण पारंपारिक पध्दतीने साजरा

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.

हिंदू धर्म संस्कृतीमधील होळी हा शेवटचा सण असल्याने तो सर्वत्र मोठ्या उत्साहात व धामधुमीचा असतो. होळी पेटविण्याकरिता सर्वत्र बच्चे कंपनीची धावपळ पहायला मिळत होती. जळावू लाकडे, शेणाच्या गोवर्‍या, गवत यांची होळी जागोजागी बनविण्यात आली होती. महागाईचा भस्मासूर, कोरोना वायरस, अज्ञान, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार या सार्‍यांची होळी करण्यात आली.

ग्रामीण भागात गावांच्या मंदिरासमोर सामुहिक होळी पेटविण्यात आली तर शहरी भागात सोसायट्यांच्या बाहेर होळी पेटविण्यात आली. महिलांनी होळीला पारंपारिक पध्दतीने बनविलेला पोळ्याचा नैवेद्य दाखवत पूजन केले. यानंतर होळीत नारळ व प्रसाद हवन करण्यात आल्या. मोठ्या उत्साहात व शांततेमध्ये हा सण पार पडला. आज धुलिवंदन निमित्त सर्वांनी रंगाचा सण साजरा केला.

अबाल वृध्द सर्वजण रंगाने लाले लाल झाले होते. पाणी व कोरड्या रंगाचा वापर करत मुलांनी सण साजरा केला. रंगाच्या पिचकार्‍या व फुग्यांनी बाजारपेठ सजली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.