Lonavala: शिवसैनिकांकडून व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिमेची होळी

Holi of the image of Venkaiah Naidu by Shiv Sainiks

एमपीसी न्यूज – शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांनी राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात व्यंकय्या नायडूंच्या प्रतिमेची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.

जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, व्यंकय्या नायडू हाय हाय, व्यंकय्या नायडूचा जाहीर निषेध असो अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात आल्या.

शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वाहतुकसेना जिल्हा अध्यक्ष व संपर्क प्रमुख महेश केदारी, माजी नगरसेवक मधुकर पवार,  समन्वयक जयवंत दळवी,  उपशहरप्रमुख संजय भोईर, मनेष पवार, तानाजी सुर्यवंशी, पंकज खोले, नरेश काळवीट, विजय आखाडे, भगवान देशमुख, उल्हास भांगरे, पिंटू शिंदे, मोहन मल्ला,  रविंद्र टाकळकर, कमर अन्सारी, मुबीन इनामदार, मा. विभाग प्रमुख सुरेश टाकवे, अशोक बोंद्रे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.