Lonavala News: लोणावळ्यातील होम स्टे असोसिएशनच्या मागणीला यश; सहाय्यक निबंधकाचे ते पत्र रद्द

एमपीसी न्यूज: नववर्षाच्या पुर्वसंध्येला बंगले भाड्याने देऊ नये अशा आशयाचे पत्र मावळचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांनी लोणावळ्यातील बंगले धारकांना बजाविले होते.(Lonavala News) या पत्राच्या विरोधात मेसर्स लोणावळा होम स्टे असोसिएशन व जुनेद बादशहा यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे विभाग यांच्याकडे दाद मागितली होती. या पुनरिक्षण अर्जावर सुनावणी नंतर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे डाॅ. संजयकुमार भोसले यांनी निकाल देताना सदरचे पत्र रद्द केले आहे.

नववर्षाच्या निमित्त लोणावळ्यात होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी यांनी डिसेंबर 2021 मध्ये जमावबंदी लागू केली होती. या आदेशान्वये सहाय्यक निबंधक मावळ यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी लोणावळ्यातील बंगले धारकांना बंगले भाड्याने न देण्याचे पत्र पाठविले होते.(Lonavala News) यावर माहिती देताना होम स्टे असोसिएशनने आमची नोंदणीकृत संस्था असून 150 च्या वर सभासद असल्याचे सांगत आमच्या बंगल्यांमध्य येणारे पर्यटक हे कौटुंबिक असतात, त्यामुळे कोरोना पसरण्याचा विषय येतो कोठे असा प्रश्न उपस्थित केला होता.

Constable recruitment: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय शिपाई भरती मधील पाच परीक्षार्थींना गैरप्रकार केल्याप्रकरणी अटक

पर्यटन विकास महामंडळाकडून होम स्टे व ब्रेड बटर योजनेंतर्गत परवाने घेऊन हा व्यावसाय आम्ही करत असल्याचे नमूद करत सदरचे पत्र रद्द करण्याची मागणी केली होती.(Lonavala News) ती मागणी विभागीय सह निबंधक यांनी मान्य करत मावळ सहाय्यक निबंधकांचे पत्र रद्द केले असल्याचे मेसर्स होम स्टे असोसिएशनचे अध्यक्ष जुनेद बादशहा यांनी सांगितले. तर होम स्टे असोसिएशनचे वकिल अँड. सुमित भाटिया म्हणाला, आता आम्ही न्यायालयात धाव घेणार असून सहाय्यक निबंधकांच्या पत्रामुळे आमच्या सदस्यांचे झालेले नुकसान भरुन देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.