Lonavala : लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समूळ उच्चाटन करणार – पोलीस निरीक्षक पाटील

एमपीसी न्यूज- पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी केला आहे. याकरिता लोणावळेकर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात कोठेही मटका, जुगार, बेकायदा दारु विक्री, रमी किंवा पत्ते खेळण्याचा क्लब, ओपन बार, पिटा अॅक्ट (वेश्या व्यवसाय) किंवा अन्य कोणताही बेकायदा धंदा सुरु असल्यास त्याबाबत नागरिकांनी माहिती कळवावी, माहिती देणार्‍याची ओळख गुप्त ठेवत संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.