Lonavala : बेकायदा दारू वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लोणावळा येथून तळेगावात दारू विक्री करण्याकरिता दारुच्या 96 बाटल्या तांदळाच्या पोत्याच्या आड लपवत घेऊन जाणारा टेम्पो लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चालक आनंद कुमार फटुराज नाडार (वय 41, रा. मोरे सुपर मार्केट बिल्डिंगचे खाली, तळेगाव दाभाडे, ता.मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणावळा येथून एका टेम्पोमधून दारुचे बाॅक्स घेऊन एकजण तळेगावात विक्रीकरिता घेऊन जात असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीसांना मिळाली.

त्यावर पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोरे, राजेंद्र मदने, अजीज मिस्त्री, पवन कराड, राहुल खैरे यांच्या पथकाने पेट्रोलपंपाजवळ हा टेम्पो अडवला.

तपासणी केली असता 14 हजार चारशे रुपयाचा दारूसाठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी दारूसाठा व टेम्पो असा 1 लाख 14 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

दोन दिवसापुर्वी इंद्रायणी पुलावर देखिल अशीच कारवाई करण्यात आली होती. वैभव सुरवसे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.