Lonavala : प्रजासत्ताक दिनी बेकायदा दारु विकताना एकाला अटक

एमपीसी न्यूज- प्रजासत्ताक दिनी बाजार भागात बेकायदा देशी दारु विकताना एकाला लोणावळा शहर पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेत अटक केली.

जहिर मुस्ताफा शेख (वय 35, रा. इंद्रायणीनगर, लोणावळा) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मनोज मोरे यांनी फिर्याद दिली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनी दारु विक्रीवर बंदी असताना शेख हा बेकायदेशीरपणे देशी दारुच्या बाटल्या ताब्यात घेऊन त्यांची जादा दराने विक्री करत असताना आढळून आला. त्याच्याकडे देशी दारुच्या 19 बाटल्या मिळून आल्या. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सामिल प्रकाश वैभव सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.