Lonavala : डोंगरगाववाडीत जि.प. शाळेवरील सिमेंटच्या 80 पत्र्यांची मोडतोड

In Dongargaonwadi, Breaking of 80 sheets of cement on the Z.P. school

एमपीसीन्यूज : डोंगरगाववाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर बसविण्याकरिता आणलेल्या 80 सिमेंटच्या पत्र्यांची काही व्यक्तींकडून मोडतोड करण्यात आली आहे.

डोंगरगावचे सरपंच सुनिल येवले यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

_MPC_DIR_MPU_II

निसर्ग चक्री वादळात डोंगरगाववाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले. या शाळेत आपल्याच गावातील लहान मुले शिकत असल्याने सरपंच सुनिल येवले यांनी एका कंपनीच्या सहकार्यातून शाळेकरिता 80 सिमेंटचे पत्रे आणले होते.

पत्रे बसविण्याचे काम न मिळाल्याने गावातील दोन व्यक्ती व दोन अज्ञात व्यक्ती यांनी सदर पत्र्यांची मोडतोड करून नुकसान केले असल्याची तक्रार येवले यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.