BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : शहरात विविध विकासकामांचे खासदार, आमदारांच्या हस्ते उद्घाटन अन् भूमीपूजन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन शुक्रवारी (दि. ७) मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, भाजपा गटनेते देविदास कडू, काॅग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मावळ तालुक्यातील व लोणावळा शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

  • नगरपरिषदेच्या वतीने नांगरगाव ते वलवण मार्गावर तसेच प्रिच्छली हिल याठिकाणी नवीन पूल बांधले आहेत. या कामांचे उद्घाटन, बाजारपेठ आणि भांगरवाडी येथील वाहतूक कोंडीवर प्रभावी ठरणार्‍या ‘भारत साॅ’मिल ते हनुमान टेकडी रस्ता डांबरीकरण, हनुमान टेकडी ते कुसगाव हद्द रस्ता डांबरीकरण अशा सुमारे दहा कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन तसेच लायन्स क्लब डायमंड यांनी बांधलेल्या पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, लोणावळा शहराची देशभर ओळख आहे. येथील रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकरणाला मान्यता मिळाली असून काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच रेल्वे उड्डाणपुलाचे काम देखील सुरु होणार आहे. भविष्यात लोणावळ्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल.

  • त्यानंतर आमदार बाळा भेगडे म्हणाले, लोणावळा शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनविण्याकरिता मागील अडीच वर्षात शासनाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याचे सांगत डिपीडिसी, नगरोत्थान योजना, दलित वस्ती विकास व राज्य सरकारच्या माध्यमातून बारा कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहिर केले.

वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दोनच दिवसापुर्वी लोणावळा रेल्वे उड्डाणपुलाकरिता साडेनऊ कोटी व गार्डन विकासाकरिता साडेनऊ कोटी रुपयांचा निधी जाहिर केला असल्याचे सांगितले. भविष्यात लोणावळा शहराच्या पर्यटन विकास व त्याकरिताच्या सोयी सुविधांवर विशेष भर देणार असल्याचे सांगितले.

  • यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मनोगतात शहरातील विकासकामांची माहिती दिली.मुख्याधिकारी सचिन पवार यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन राजेंद्र दिवेकर यांनी केले. नगरसेवक निखिल कविश्वर यांनी सर्वांचे आभार मानले.
HB_POST_END_FTR-A2

.