BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : इंडियन स्काऊट गाईड फेलोशिपचे राष्ट्रीय संमेलन उत्साहात

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- इंडियन स्काऊट गाईडचे तेरावे राष्ट्रीय संमेलन लोणावळ्यात पार पडले. देश विदेशातील स्काऊटन्स या संमेलनाला उपस्थित होते.

अभिनेते मुकेश खन्ना यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. देशविदेशातून चारशेहून अधिक कार्यकर्ते या संमेलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य फेलोशिपचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार आगरवाल, सचिव डॉ.अमोल कालेकर, लोणावळा गिल्डच्या उपाध्यक्षा प्रगती साळवेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संगम, पुणे येथे झालेल्या युवा गौरव समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जम्मू कश्मिर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल उपस्थित होत्या.

या प्रसंगी बोलताना खन्ना म्हणाले, ” समाजासाठी झटणार्‍या स्काऊट चळवळीतील लोकांमध्ये उपस्थित राहून मला अत्यानंद होत आहे. गुजरात भूकंपाच्या वेळी मी स्वतः स्काऊट विद्यार्थ्यांच्या सोबत मदतफेरी काढून निधी उभा केला होता” अशी आठवण खन्ना यांनी बोलून दाखवली तसेच
स्काऊट हा नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तयार असतो व शक्तीमान हा देखील एक स्काऊटच होता असे सांगून आगामी काळात शक्तीमान मालिकेच्या येणाऱ्या सिक्वलबाबत त्यांनी भाष्य केले.

राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट योगदान देणाऱ्या स्काऊट युवकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. प्रसिध्द व्यावसायिक अर्जुन व्यास यांच्या हस्ते फेलोशिप बझारचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पोतराज व वासुदेव यांनी आपल्या कलेने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. संमेलनात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, मेघालय, उत्तर प्रदेश या राज्यांनी आपली छाप उमटवली. भारत स्काऊट गाईड संस्थेच्या इंटरनॅशनल कमिशनर अमेलिया स्वेअर , फेलोशिप राष्ट्रीय कार्यालयाचे खजिनदार संपत कोठारी व वाहतूक सेना उपाध्यक्ष महेश केदारी यांचे हस्ते लोणावळा नगरपालिकेच्या साठ विद्यार्थ्यांना मोफत गणवेषाचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. मदन मोहन राठी, सी.एम्.पगार, मधू कालिया, सुरेंद्रकुमार आगरवाल व सतीश खन्ना यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विष्णू आगरवाल, विजय जोरी, सुरेश गायकवाड, ऋषी सरवदे, शशिकांत भोसले, श्रावणी कामत, रत्नप्रभा गायकवड, संतोषी तोंडे, हेमलता शर्मा, नितू पुजारी, सायली जोशी इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.