Lonavala : आयएनएस शिवाजी प्रशिक्षण केंद्रातील तीन प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह

INS Shivaji Training Center trainees Corona three positive

एमपीसीन्यूज : लोणावळा येथील भारतीय नौदलाचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजी येथे नव्याने दाखल झालेल्या तीन वीस वर्षीय प्रशिक्षणार्थी तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे स्वँब तपासणी अहवाल आज पाॅझिटिव्ह आले असून पुण्यातील कमांड रुग्णालय येथे त्यांच्यावर पुढिल उपचार सुरू आहेत.

हे तिघेही उत्तर प्रदेशातील मथुराचे रहिवाशी आहेत. दि. 10 जून रोजी ते आयएनएस शिवाजी येथे प्रशिक्षणासाठी आले होते. त्यानंतर त्यांना कॅम्पसमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते.

दि.  19 जून रोजी कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना कोंढवा येथील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, आज (शनिवारी) त्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मावळ तालुक्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे पाच रुग्ण निष्पन्न झाले. यामध्ये वराळे येथे एक, तळेगावात एक व आयएनएस शिवाजी कुरवंडे येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.

त्यामुळे मावळातील कोरोना रुग्णांची संख्या 50 झाली आहे. यापैकी 29 सक्रिय रुग्ण असून 19 जण बरे झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.