Lonavala : सिंहगड महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धांना सुरुवात

एमपीसी न्यूज- निवृत्ती बाबाजी नवले महाविद्यालय व पुणे जिल्हा क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धा आजपासून कुसगाव येथील सिंहगड लोणावळा कॅम्पसमध्ये सुरु झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यामधील 93 महाविद्यालयाच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन संकुल संचालक डॉ. माणिक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. शोभा शिंदे, डॉ. गिरीश ढमाले व डॉ. किशोर पठारे, डाॅ. जयवंत देसाई, डाॅ. रोहोकले, डाॅ. मिश्रा यांच्यासह महाविद्यालयाच्या विविध विभागाचे प्राचार्य व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

कॅम्पसमध्ये चार व्हाॅलीबाॅल कोर्ट बनविण्यात आले असून यावर आठ महाविद्यालयांच्या संघांनी आपला खेळ दाखविला. यामध्ये आर.जे.एस.पी.एम भोसरी, आय.सी.एम.परंदवाडी, वाघिरे महाविद्यालय सासवड व इंजिनिअरिंग कॉलेज माळेगाव या संघांनी वर्चस्व मिळविले उर्वरित 36 संघांमध्ये उद्या बाद पद्धतीने स्पर्धा होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.