Lonavala : वेहेरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायतच्या सरंपचपदी कल्पना माने बिनविरोध

एमपीसी न्यूज- वेहेरगाव दहिवली ग्रुपग्रामपंचायतीच्या सरंपचपदी कल्पना बबनराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरंपच सचिन येवले यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.या रिक्त जागेकरिता ही निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत सरपंचपदासाठी कल्पना माने यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कार्ला विभागाचे मंडल अधिकारी माणिक साबळे यांनी घोषित केले. त्यांना सहाय्यक म्हणून कार्ला तलाठी घनश्याम सोमवंशी व ग्रामसेवक एम बी थोरात यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित सरंपच कल्पना माने यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरंपच सचिन येवले, उपसरपंच राखी पडवळ, माजी सरंपच दत्तात्रय पडवळ, नीलम येवले, संतोष रसाळ, माजी उपसरपंच द्रोपदाबाई गायकवाड, सदस्या सपना देशमूख यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी वेहेरगाव तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, माजी सरंपच गणपत पडवळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद बोत्रे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जितेंद्र बोत्रे, मावळ शिवसेना संघटक सुरेश गायकवाड, तानाजी पडवळ, माजी उपसरपंच प्रदीप हुलावळे, आनंदराव गोपाळे, कृष्णा बुचडे, शहाजी पडवळ, वसंतराव माने, किरण येवले, पोलिस पाटील अनिल पडवळ, कांचन चव्हाण, दतात्रय बोत्रे, अरुण थोरवे, शंकरराव पडवळ, रामदास थोरवे, कैलास पडवळ, पांडुरंग मोढवे, अनंता ढवळे, गोरख बांगर, युवराज पडवळ, मोरेश्वर पडवळ, जयवंत देशमुख, संजय देवकर, अनिल गायकवाड, एकनाथ गायकवाड, दिनेश पडवळ, दत्ता कोंडभर, ज्ञानदेव देवकर यांच्यासह वेहेरगाव गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच कल्पना माने यांची निवड झाल्यावर म्हणाल्या, “गावातील विकासाला चालना देण्याचा व गावातील मूलभूत सुविधा सुरळीतपणे पुरवण्याचा प्रयत्न करणार”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.