Truck driver injured : खंडाळा घाटातील बोगद्यात ट्रक पलटी झाल्याने ड्राइव्हर जखमी

एमपीसी न्यूज : खंडाळा घाटातील बोगद्यात ट्रक पलटी झाल्याने ड्राइव्हर जखमी झाला आहे.ड्रायव्हरचा नियंत्रण सुटल्याने ट्रक प्रथम दुभाजकाला धडकला व नंतर पलटी झाला. अशी असल्याची लतीफ मुजावर, पोलीस उपनिरीक्षक, खंडाळा पोलीस चौकी यांनी दिली आहे.

PCMC News : वैद्यकीय सेवेतील दर वाढीनंतर रुग्णालयातील भरणा वाढला

त्यांनी सांगितले की, आज पहाटे 2.30 ते 3:00 वाजताच्या दरम्यान एक ट्रक खंडाळा बोगद्यातून जात होता. ड्रायव्हरचा ताबा या ट्रक वरून सुटल्याने तो प्रथम दुभाजकाला धडकला व नंतर पलटी झाला. क्रेन बोलावून त्या ट्रकला सरळ करण्यात आले व त्यामध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आले.(Truck driver injured) या अपघातात ड्रायव्हरचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते.  घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ड्रायव्हरला रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याने त्याचे नाव कळू शकले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.