_MPC_DIR_MPU_III

Lonavala : गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण ही काळची गरज – खासदार किरीट सोमय्या

एमपीसी न्यूज- काळाची गरज ओळखत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे असे मत खासदार किरिट सोमय्या यांनी व्यक्त केले. लोणावळ्यातील रायवुड इंटरनॅशनल या शाळेतील आलेश डे या वार्षिक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_IV

यावेळी लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेविका आरोही तळेगावकर, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शाळेचे डायरेक्टर व मुख्याध्यापक रोशन पटेल, व्यवस्थापकिय संचालक पटेल, सीईओ फरहोश पटेल, संचालक कीर्ती शहा, निरव डेव्हलर्पसचे निरव आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सोमय्या म्हणाले, “आमचा कल हा शाळांना डिजिटल करण्याकडे आहे. शाळा डिजिटल झाल्या तर विद्यार्थी डिजिटल होईल व पर्यायने देश डिजिटल होईल. शाळा ही डिजिटल इंडियाची पहिली पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारची आयुष्यमान भारत ही योजना नागरिकांच्या आरोग्यासाठी संजिवनी ठरणार असून लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे”

यावेळी लहान मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. कराटेचे प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात आले. शाळेमध्ये आंतरवर्ग परीक्षेत प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी व शिक्षक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.