Lonavala : जिल्हा परिषद शाळेत इंग्रजीचे खासगी प्रशिक्षण ; डेल्ला जिल्हा परिषद शाळेची हायटेक भरारी

एमपीसी न्यूज- डेल्ला ग्रुपच्या वतीने कुणेनामा येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली असून याठिकाणी आठवीचा खासगी वर्ग सुरु करण्यात आला आहे. याकरिता आवश्यक असणारा शिक्षक वर्ग डेल्ला ग्रुपच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे. केवळ मातृभाषेचे ज्ञान असून उपयोगाचे नाही. आयुष्यात यशस्वी होण्याकरिता मराठी भाषेप्रमाणेच हिंदी व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असल्याने कुणेनामा जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी सुरु करण्यात आली आहे.

चांगल्या दर्जाचे शिक्षक, मुलांना कराटे व मार्शल आर्ट, स्विमिंग रॅपलिंग, नेमबाजी, योगा, गायन, वादन, नृत्य याचे प्रशिक्षण हे प्रख्यात तज्ञांकडून दिले जात आहे. याठिकाणी शिकणार्‍या 160 मुलांचे पालकत्व डेल्ला समूहाने घेतले असून त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण ते नोकरी पर्यत सर्व जबाबदारी मिस्त्री यांनी घेतली आहे. लहान वयापासून मुलांना माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून याठिकाणाहून बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा वा मुलगी ही आत्मविश्वासा सोबत मल्टी टॅलेंटेड असतील असा विश्वास जिमी मिस्त्री यांनी व्यक्त केला. डेल्ला जिल्हा परिषद शाळेचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्त मिस्त्री यांनी ग्रामस्थ व पालकांशी संवाद साधला.

_MPC_DIR_MPU_II

स्नेहसंमेलनाच्या निमित्त मुलांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. शाळेत शिकणारी बहुतांश मुले ही ठाकर व कातकरी समाजातील आहेत, ज्या मुलांना मराठी नीट बोलता येत नाही. त्यांचे इंग्रजीमधील बोलणे ऐकून उपस्थित मान्यवर आवाक झाले होते. यावेळी मावळचे गट शिक्षण अधिकारी शरदचंद्र माळी, जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशिकर व अलका धानिवले, पंचायत समिती सदस्य महादु उघडे, कुणेनामाचे सरपंच संदीप उंबरे, उपसरपंच संजय ढाकोळ, रामदास पांडवे, गणपत गोजे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोणावळा शहराविषयी बोलताना डेल्ला समूहाचे अध्यक्ष जिमी मिस्त्री म्हणाले, “देशभरातील विविध ठिकाणं पर्यटनस्थळं म्हणून विकसित होत असली तरी सध्या देशात कोठेही दर्जेदार पर्यटन मिळत नाही. ही कमी भरुन काढत लोणावळा शहरात दर्जेदार व गुणवत्तेवर आधारित पर्यटन विकसित करण्याचा माझा मानस आहे. याकरिता लोणावळा व खंडाळा परिसरातील पर्यटनस्थळांची ब्लु प्रिंट तयार करत रस्त्यावरील मक्याचे कणीस विकणार्‍यापासून पंचतारांकित हाॅटेलपर्यत पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा व गुणवत्तापुर्ण पर्यटन कसे मिळेल यावर काम करत जगभरातील पर्यटकांना येथे आकर्षित करण्याचा मास्टर प्लान येत्या काही काळात पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार करु” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुणेगाव याठिकाणी लवकरच कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची स्थापना करत येथील आदिवासी बांधव व नागरिक यांना मल्टीस्किल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कुणेनामा हा आदिवासी बहुल भाग असून येथील नागरिकांकरिता वैद्यकीय सुविधेकरिता मोफत ओपीडी सुरु करण्यात येणार आहे. डेल्लाच्या माध्यमातून एक हजार स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला काऊंटर टेरिझम टुरिझम ही अँडव्हेंचर पर्यटनाची नवी संकल्पना राबवली असून त्याला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे जिमी मिस्त्री यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.