BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : इंद्रायणी नदीवरील पुलाला तडा गेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण

एमपीसी न्यूज – कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाला तडा गेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पुलाला तडे गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायल झाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी याठिकाणी भेट देत पुलाची पाहणी केली.

कार्ला मळवली हा रहदारीचा मार्ग असून त्यापुलावरुन चोवीस तास वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. स्थानिक नागरिकांसह याभागातील भाजे लेणी व धबधबा, पाटण लेणी, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला याठिकाणी शनिवार व रविवारसह इतर दिवशी देखील पर्यटकांची व वाहनांची याठिकाणाहून सतत ये जा सुरु असते. इंद्रायणी नदीवरील हा पुल साधारण 30 ते 35 वर्षापुर्वी बांधण्यात आला आहे.

  • हा पुल वाहतुकीसाठी अरुंद ठरत असल्याने त्याचे नुतनीकरण करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून सुरु असताना आता या पुलाला तडा गेल्याने सोशल मिडियावर या पुलाबाबत चर्चेला उधाण आले असल्याने मावळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आँडिट करत पुलाबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3