Lonavala Lockdown News: शहरात लाॅकडाऊन होणार नाही – सुरेखा जाधव

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरात मागील दोन दिवसांपासून लॉकडाऊन घेण्यात येणार असल्याच्या चर्चा आहे. मात्र असा कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन लोणावळा शहरात घेतला जाणार नसल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  लॉकडाऊन बद्दलच्या सर्व अफवांना पूर्णविराम देण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवि पवार, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, डॉ. अमोल अगरवाल हे उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्षा जाधव, उपनगराध्यक्ष पुजारी आणि मुख्याधिकारी पवार यांनी यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती पत्रकारांना दिली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घेणं हा एकमेव पर्याय नाही याउलट लोणावळेकर नागरिकांनी स्वतःहुन शासकीय निकषांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यासोबतच नागरिकांनी आपले आजार लपवून ठेऊ नये असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले.

आजपासून शहरात नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्याकडून विशेष कारवाई मोहिम हाती घेत नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.