Lonavala : लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि. ६) आज जागतिक पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षात पत्रकार संघाचे अध्यक्ष निखिल कविश्वर, सहाय्यक नगररचना कार गोडबोले, वाचनालय प्रमुख विजय शेवाळे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विशाल विकारी, सचिव नितिन तिकोणे, पत्रकार परिषद प्रमुख विशाल पाडाळे, सदस्या संतोषी तोंडे आदींनी दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी वार्तालापात जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची केलेली पायाभरणी व आजची पत्रकारीता यावर विचारमंथन करण्यात आले. सिंहगड महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण नाट्य परिषद, भोंडे हायस्कूल यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत पत्रकारांचा सन्मान केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.