Lonavala : विभागीय कबड्डी स्पर्धेत लोणावळा महाविद्यालय विजयाचा मानकरी

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभाग आयोजित विभागीय क्रीडा महोत्सव अंतर्गत लोणावळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.

लोणावळा महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र 6261A मधील प्रवेशित विद्यार्थ्याच्या कबड्डी संघाने यंदा प्रथमच क्रीडास्पर्धेत सहभाग नोंदविला होता. सी. टी. बोरा महाविद्यालय शिरूर येथे पार पडलेल्या या सांघिक स्पर्धेत बारामती, इंदापूर, शिरूर, पंढरपूर, पुणे, लोणावळा आदी महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग घेतला होता.

_MPC_DIR_MPU_II

लोणावळा महाविद्यालयाच्या संघाने पुणे संघाला आणि बारामती येथील संघाला अनुक्रमे 36-23 आणि 31-21 गुणांनी मात करत अंतिम सामन्यात स्थान प्राप्त केले. अतीटतीच्या अंतिम सामन्यात इंदापूर येथील संघासोबत लोणावळा महाविद्यालयांनी दुसऱ्या भागात केवळ 6 गुणाची आघाडी घेत 21-15 ने विजयश्री प्राप्त केली.

संघातील तुषार शेडगे, आशिष जाधव, रसिक काळे, वैभव खराडे, हृतिक लाड यांची विद्यापीठाच्या पुढील स्पर्धेकरिता निवड झाली. महाविद्यालयाच्या संघात वरील खेळाडू सहित यश गायकवाड, हर्ष गायकवाड, कुणाल बोरकर, मंदार आंबेकर, यांनी मोलाचे योगदान दिले.

सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. मोहिते, केंद्र संयोजक डॉ. धपाटे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय सहाय्यक कुलसचिव मावळे आणि विभागीय संचालक वामन यांनी विजयी संघाचे कौतुक केले. अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. रोहन वर्तक आणि प्रशिक्षक विलास जाधव यांनी संघाच्या यशकारिता विशेष प्रयत्न केले. लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. एन. पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.