Lonavala : धार्मिक ऐतिहासिक व सामाजिक देखावे पाहण्यासाठी लोणावळेकरांची गर्दी

एमपीसी न्यूज- धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक पौराणिक देखाव्यांसह सुंदर व आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईची परंपरा यावर्षी देखील लोणावळा शहरात कायम राखण्यात आली आहे. यामध्ये शिवराज्याभिषेक, कृष्णावतार कंसाचा वध, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, सोन्याची जेजुरी, अलबत्या गलबत्या या देखाव्यांचा समावेश असून, काही मंडळांनी पर्यावरण संवर्धन व स्वच्छता अभियान याविषयावर संदेशाव्दारे समाजप्रबोधन करत जनजागृती करण्यावर भर दिला आहे. तर अनेकांनी फुलांची सुंदर सजावट साकारली आहे. येथील देखावे पहाण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील भाविक गर्दी करत आहेत. लोणावळा शहरात लहान मोठी 49 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे अाहेत.

मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 93 वे वर्ष असून, लालबागच्या राजाची आकर्षक व भव्य गणेश मूर्ती आकर्षण ठरत आहे. सचिन गोणते हे मंडळाचे अध्यक्ष आहे. मंडळाच्या वतीने बाप्पांच्या मूर्तीजवळ फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

मानाचा दुसरा गणपती असलेल्या रायवूड उद्यानातील तरूण मराठा गणेश मंडळाचे हे 86 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा पौराणिक देखावा साकारला आहे. शुभम मानकामे हे मंडळाचे अध्यक्ष आहे.

मानाचा तिसरा गणपती असलेल्या संत रोहिदास मित्र मंडळाचे हे 80 वे वर्ष असून, या वर्षी फुलांची आकर्षक सजावट करत साधेपणाने उत्सव साजरा केला आहे. राकेश कदम हे मंडळाचे अध्यक्ष आहे.

मानाचा चौथा गणपती असलेल्या गवळीवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 81 वे वर्ष असून, या वर्षी मंडळाने स्वच्छता अभियान व प्लास्टिकमुक्ती या विषयावर प्रबोधनपर देखावा सादर केला असून, साधेपणाने उत्सव साजरा केला आहे. सूर्यकांत औरंगे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मानाचा पाचवा गणपती असलेल्या वलवण येथील शेतकरी भजनी मंडळाने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यावर भर दिला आहे. उत्सव नेहमीप्रमाणे साधेपणाने साजरा केला आहे.

मावळचा राजा अशी ओळख असलेल्या शिवाजी मित्र मंडळाने भव्यदिव्य महाल उभारण्याची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली आहे. मंडळाने यावर्षी एका काल्पनिक महालाची सुंदर व भव्य प्रतिकृती साकारली असून प्रकाश चौहान मंडळाचे अध्यक्ष आहे.

वर्धमान सोसायटीतील नेहरू तरूण मंडळाचे हे 47 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी भव्य ‘शिव राज्याभिषेक सोहळा’ हा देखावा साकारला आहे. राहुल ओसवाल हे मंडळाचे अध्यक्ष आहे.

शिवाजी चौकातील अखिल महात्मा फुले भाजी मंडई मंडळाचे हे 71 वे वर्ष असून, यावर्षी फुलांची सजावट करत साधेपणाने उत्सव साजरा केला आहे.. चंद्रकांत गदादे हे मंडळाचे अध्यक्ष आहे.

बाजार पेठेतील राणाप्रताप नेताजी मित्र मंडळाचे हे 81 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी देवकीचा आठवा पुत्र, कंसाचा वध हा देखावा साकारला आहे. कल्पेश राठोड हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

प्रियदर्शनी संकुल जवळील तुफान मित्र मंडळाचे हे 54 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी जेजुरी गड दुसरे कैलास शिखर हि प्रतिकृती साकारली आहे. नितीन वाळंज हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मावळा पुतळा येथाल तानाजी युवक मित्र मंडळाचे हे 53 वे वर्ष असून, मंडळाने या वर्षी केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व महल हा भाविकांचे लक्ष वेधत आहे. आशिष पाँव हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. तुंगार्ली येथील ओंकार तरूण मंडळाचे हे 41 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी ‘ फुलांची आकर्षक सजावट केली आहे. नगरसेवक राजु बच्चे हे मंडळाचे मानद अध्यक्ष असून शफीकभाई खलिफा हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

प्रियदर्शनी संकुल येथील अष्टविनायक मित्र मंडळाचे हे 40 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी ‘अलबत्या गलबत्या आणि प्लास्टिक बंदी हा प्रदूषण मुक्ती व आरोग्य विषयक सामाजिक देखावा साकारला आहे. गौरव गवळी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. नवयुग मित्र मंडळाचे हे 57 वे वर्ष असून, यावर्षी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. विनोद आगरवाल हे मंडळाचे अध्यक्ष आहे. शिवाजी चौकातील शिवाजी उदय मित्र मंडळाने यावर्षी साधेपणाने उत्सव साजरा केला आहे. महाराष्ट्र मातंग समाज मंडळाचे हे 68 वे वर्ष असून, मंडळाने यावर्षी फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

शंभर वर्षापेक्षा जुन्या असलेल्या भांगरवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. भांगरवाडी येथे टिळकांनी प्रतिष्ठापणा केलेल्या श्री. हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यार्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला असून, मंडळाचे हे 120 वे वर्ष आहे.

पोस्टमन चाळीतील गजानन व जय महाराष्ट्र मित्र मंडळाने या वर्षी संयुक्तपणे उत्सव केला आहे. लोणावळ्याचा लाडका राजा मंडळाची लालबागच्या राजाची भव्यमूर्ती आकर्षण ठरत आहे. बाळकृष्ण चिकणे हे मंडळाचे अध्यक्ष आहे.

कुसगाव दत्तवाडी येथील श्री. नवनाथ मित्र मंडळाने आकर्षक पुष्प सजावट साकारली असून, मंडळाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. हुडको येथील सह्याद्री मित्र मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. यासह श्री साई आझाद मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ भांगरवाडी, जयहिंद मित्र मंडळ नांगरगाव, गणेश मित्र मंडळ भांगरवाडी, नटराज मित्र मंडळ, शिवाजी युवक मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, मातंग समाज मित्र मंडळ यांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे.

  

  

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.