Lonavala : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा बाजारपेठ पूर्णतः लाॅकडाऊन

लोणावळा नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा शहर‍ाची मध्यवर्ती बाजारपेठ पुर्णतः लाॅकडाऊन करण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलिसांनी घेतला आहे.

शहराच्या सर्व प्रभागांमध्ये जीवनावश्यक सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याने नागरिकांनी बाजारात येऊ नये असे आवाहन दोन्ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वरील निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याकरिता कृष्णाई हाॅटेलच्या गेटजवळ व भांगरवाडी येथील इंद्रायणी पूल याठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून बाजार भागाकडे येणार्‍या प्रत्येक नागरिकाची व वाहनांची चौकशी करुन अतिमहत्वाचे काम असेल तर सोडण्यात येणार आहे.

बिनकामाचं कोणी या नाकाबंदीत सापडल्यास त्याच्यावर संचारबंदीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरात आज अखेर 55 जणांवर संचारबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी पाच जणांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड व सात दिवस कारावासाची शिक्षा झाली आहे, अशी माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like