Lonavala : पोलिसांनी पाठलाग करून हस्तगत केला गावठी कट्टा

एमपीसी न्यूज- गावठी कठ्ठा घेऊन लोणावळ्यात आलेल्या एका इसमाला लोणावळा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडील गावठी कठ्ठा पोलिसांनी ताब्यात घेतला. बुधवारी (दि. 18) रात्री हा प्रकार घडला.

अंकुश ज्ञानदेव लोखंडे (वय- 22 वर्ष रा.गुरव वस्ती, ओळकाईवाडी, लोणावळा, ता.मावळ जि पुणे) असे या इसमाचे नाव आहे.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांना लोणावळा शहरात एक इसम बेकायदा गावठी कट्टा बाळगून फिरत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस काँन्स्टेबल अजीज मेस्त्री, राजेंद्र मदने, पवन कराड, मनोज मोरे यांनी संशयित इसमाचा शोध घेतला असता, रायवूड गार्डनमधील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे तो संशयितरित्या थांबलेला दिसला. पोलीस पथकाने त्याला थांबण्यास सांगितले असता, पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. गुन्हे शोध पथकाचे जवानांनी देखील फिल्मी स्टाइल पाठलाग करून त्याला पकडले.

त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा खोचलेला मिळून आला. सदर शस्त्र पंचनामा करुन जप्त करण्यात आले. लोखंडे हा गावठी कठ्ठा घेऊन लोणावळ्यात कशासाठी आला होता, त्यांच्याकडे हे शस्त्र आले कोठून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.