Lonavala : चारा खाताना बैलाच्या तोंडात फुटला डुक्कर मारण्याच्या बॉम्ब; बैलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डुक्कर मारण्याची वापरला जाणारा बॉम्ब अज्ञातांनी बैलांच्या दावणीत टाकला. बैलाने चा-यासोबत बॉम्ब खाल्ला. गवात चावत असताना बॉम्बचा स्फोट झाला. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील सावंतवाडी महागाव येथे झाला.

गबळू दीपा नवघणे (वय 55, रा. सावंतवाडी महागाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गबळू हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे असलेली जनावरे ते त्यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत बांधतात. सोमवारी सकाळच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत डुक्कर मारण्याचा बॉम्ब ठेवला. हा बॉम्ब गबळू यांच्या मोहरा नावाच्या बैलाने चा-यासोबत खाल्ला. चारा खात असताना अचानक बॉम्बचा बैलाच्या तोंडात स्फोट झाला.

यामध्ये बैलाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.