Lonavala : लोणावळा नगरपरिषदेकडून लोणावळा पोलीसांना नविन वर्षात 12 ट्रॅफिक वाॅर्डनची भेट

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेने वाहतुक नियमन कामाकरिता नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोणावळा शहर पोलीसांना बारा वाॅर्डन दिले आहेत. शहरात वाहतुकीचे योग्य नियोजन करुन नागरिकांना वाहतुक कोंडीमुक्त रस्ते मिळावे याकरिता हे वाॅर्डन देण्यात आले असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.    

लोणावळा शहरात वाहतुक कोंडी ही मोठी समस्या आहे. स्थानिक नागरिकांसह लोणावळा शहरात शनिवार आणि रविवार तसेच सुट्टीच्या दिवसात फिरायला येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते, सोबतच परिसरातील अनेक गावांना लोणावळा हीच मोठी बाजारपेठ असल्याने शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गहन बनत चालली आहे. ही समस्या सोडविण्याकरिता व वाहतुक नियमनाकरिता पोलीस कर्मचारी कमी पडत असल्याने प्रभावीपणे उपाययोजना करता येत नव्हत्या, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी शहरातील वाहतुक नियमनाकरिता वाॅर्डन मिळावेत अशी मागणी नगरपरिषदेकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लोणावळा नगरपरिषदेने बारा वाॅर्डन आज नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपलब्ध करुन दिले आहे.

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक निखिल कविश्वर, आरोग्य सभापती बिंद्रा गणात्रा, माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड, वृक्ष प्राधिकरण समितीचे हर्षल होगले यांच्या उपस्थितीमध्ये सदर वाॅर्डन शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी नितेश कवडे व झेंडे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.