Lonavala : हैदराबाद येथील सामुहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा लोणावळ्यात निषेध

एमपीसी न्यूज – हैदराबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी ह्या युवतीवर झालेला सामुहिक अत्याचार आणि निर्घुन केलेल्या हत्या प्रकरणाचा लोणावळा शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (A) महिला आघाडी यांच्या वतीने निषेध व्यक्त करून याबाबत लोणावळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा यमुना साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, लोणावळा शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के, चंद्रकात गायकवाड, बौध्द महासभा तालुकाध्यक्ष अमर चौरे, अशोक सरवते, महिला आघाडी लोणावळा अध्यक्षा उषा जाधव, लीलावती अडसुळे, वंदना गायकवाड, शोभना गायकवाड, कमल ओव्हाळ, सीमा देसाई, मीना साळवे, कुशल वाघमारे, राजु सरवते, जयराम कदम, मिलिंद भालेराव, शाम भालेराव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.