Lonavala : मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी मारुती आडकर यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज- मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी ऑलिम्पिक वीर मारुती आडकर, कार्याध्यक्षपदी संभाजी राक्षे, सचिवपदी बंडू येवले, उपाध्यक्षपदी खंडू वाळूंज व खजिनदारपदी रामनाथ वारिंगे यांची फेरनिवड करण्यात आली.

मावळ तालुका मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष पै. चंद्रकांत सातकर यांच्या अध्यक्षतेखाली मारुती आडकर, संभाजी राक्षे, खंडू वाळूंज, बंडू येवले, विष्णू शिरसाट यांनी २०१९ ते २०२३ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच केली आहे.

सहयोगी उपाध्यक्षपदी मनोज येवले, सहसचिवपदी पप्पू कालेकर, संघटकपदी ज्ञानेश्वर काकडे, देविदास कडू, सल्लागारपदी राजू बच्चे व कार्यकारिणी सदस्यपदी विष्णू शिरसाट, तानाजी कारके, काळूराम असवले यांची तर पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पश्चिम विभागीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी सचिन घोटकुले, किशोर सातकर यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

आश्रयदाते- पै. चंद्रकांत सातकर
अध्यक्ष- मारुती आडकर
कार्याध्यक्ष- संभाजी राक्षे
सचिव- पै. बंडू येवले
सहसचिव- पै. पप्पू कालेकर
उपाध्यक्ष- खंडू वाळूंज
सहयोगी उपाध्यक्ष- मनोज येवले
कार्यकारिणी सदस्य- विष्णू शिरसाट, तानाजी कारके, काळूराम असवले
संघटक- ज्ञानेश्वर काकडे, देविदास कडू
सल्लागार- राजू बच्चे
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पश्चिम विभागीय कार्यकारिणी सदस्यपदी- सचिन घोटकुले, किशोर सातकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.