Lonavala : पुणे जिल्हा कबड्डी लीग स्पर्धेत मावळ संघाला संधी

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने येत्या 25 व 26 सप्टेंबर दरम्यान लिमगाव धावडी याठिकाणी होत असलेल्या पुणे जिल्हा कबड्डी लीग स्पर्धेत प्रथमच मावळ तालुक्याचा संघ सहभागी होणार अाहे. या संघाची घोषणा नुकतीच मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मावळ तालुक्यातील कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता स्थापन करण्यात आलेल्या मावळ तालुका कबड्डी असोसिएशनने मावळ तालुक्यातील विविध भागाती खेळाडूंची निवड चाचणी घेत त्यामधून तालुक्याचा संघ नव्याने स्थापन केला आहे. जिल्हा कबड्डी लीग स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील आठ संघांची निवड करण्यात आली असून यामध्ये म्हणून तालुक्याच्या या संघाला संधी मिळाली ही तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे असोसिएशनचे तालुकाध्यक्ष रमेश पाळेकर यांनी सांगितले.

यावेळी मुकेश परमार, संघाचे असोसिएशनचे खजिनदार विलास जाधव, सदस्य किशोर दाभणे, रामभाऊ जाधव, महेश म्हसणे, उमेश तारे, शेखर खिल्लारे, रामदास पाळेकर, प्रमोद खिल्लारे, विशाल विकारी हे उपस्थित होते. खेळा दरम्यान खेळाडूंना काही इजा झाल्यास खबरदारी म्हणू संघातील सर्व खेळाडूंचा असोसिएशनच्या वतीने विमा देखील काढण्यात आला आहे.

मावळ तालुका कबड्डी संघ

आशिष जाधव (लोणावळा – कर्णधार), रसिक काळे (वलवण), लक्ष्मण जोरे (वाकसई), वैभव खराडे (लोणावळा), प्रतिक भोर (वडगाव), नबिन शेख (वडगाव), सौरभ पाटील (तळेगाव), अश्पाक मुलानी (तळेगाव), तुषार शेडगे (उंबरवाडी), ओमकार खिल्लारे (लोणावळा), रुत्विक लाड (लोणावळा), पुनिकेत गायकवाड (लोणावळ), अतुल लाड (व्यवस्थापक), संकेत जाधव (प्रशिक्षक), रमेश पाळेकर (संघ मालक)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.