BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांना ‘मावळ वार्ता प्रशासकीय सेवा’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांना प्रशासकीय सेवेतील मावळ वार्ता प्रशासकिय सेवा पुरस्कार, माजी राज्यमंत्री मदन बाफना यांना जीवन गौरव पुरस्कार तर दीपक शहा यांना सामाजिक कार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मावळ वार्ता फाऊंडेशनच्या वतीने पुणे आणि रायगड जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्‍या व्यक्ती व संस्था यांचा दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. मागील अठरा वर्षापासून मावळ वार्ता फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजात उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थाचा अविरतपणे सन्मान केला जात आहे.

यावर्षी राज्यसभेचे खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री मदन बाफना व नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सिने अभिनेत्री मोनालिसा बागल, वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, राजेंद्र कुडे, नगरसेवक निखिल कविश्वर, सुधीर शिर्के, संध्या खंडेलवाल, संजय घोणे, दत्तात्रय गवळी, पंचायत समिती सभापती सुर्वणा कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राजन राणे, कृष्णन चिल्लाई, अविनाश बात्रा, ‘मावळ वार्ता’चे संचालक संजय अडसुळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र टेलर, किरण गायकवाड, जितेंद्र बोत्रे, रमेश पाळेकर, बाळासाहेब फाटक, भरत तिखे, अनिल टाकळकर, सुनिल कडूसकर, नविन भुरट, धिरजलाल टेलर व मान्यवर उपस्थित होते.

आध्यात्मिक क्षेत्रात लहान वयात उत्तुंग कार्य करणार्‍या किर्तनकार हभप जयश्री महाराज येवले यांना आध्यात्मिक पुरस्कार देऊन तर कुस्ती क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेली सावरी सत्यवान सातकर हिला क्रिडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार डाॅ. शैलेश शहा यांना तर शिवली भडवली शाळेचे शिक्षक अतिष थोरात यांना शैक्षणिक, सुरेश साखवळकर यांना पत्रकारिता व मोनालिसा बागल हिला कला पुरस्कार देण्यात आला.

ज्येष्ठ नगरसेवक भरत हारपुडे यांना यावर्षीचा उत्कृष्ट काँन्सिलपटू पुरस्कार देण्यात आला. ग्राम विकासाचे सामुदायिक कार्य करणार्‍या सुदुंबरे ग्रामपंचायतीला ग्राम गौरव पुरस्का देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like