Lonavala : स्विकृत सदस्यपदी मिलिंद खळदकर यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या स्विकृत सदस्य पदावर मिलिंद सुरेश खळदकर यांनी आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपा गटातील स्विकृत सदस्य बाळासाहेब जाधव यांनी पदाचा राजीनामा दिल्याने स्विकृत सदस्य पद रिक्त झाले होते.

जिल्हाधिकारी पुणे यांनी दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या पिठासनाखाली स्विकृत सदस्य निवड प्रक्रिया नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली.विहित कालावधीमध्ये गटनेते देविदास कडू यांनी मिलिंद खळदकर यांचा एकमेव अर्ज दाखल केल्याने दुपारी दोन वाजता विशेष सभेत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी नामनिर्देशित स्विकृत सदस्य पदावर मिलिंद खळदकर यांची बिनविरोध निवड जाहिर केली.

यावेळी मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपाचे गटनेते देविदास कडू, शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका तसेच अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.