Lonavala : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतले कुलस्वामीनी एकविरा देवीचे दर्शन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज कार्ला गडावर येऊन कुलस्वामीनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची पत्नी शर्मिला, मुलगी र्उवर्शी, मुलगा अमित आणि सूनबाई मिताली उपस्थित होते.

नवरात्र उत्सवानिमित्त राज ठाकरे दरवर्षी कार्ला गडावर येऊन कुलस्वामिनींचे दर्शन घेतात. यंदा निवडणुकीचे वातावरण असताना यामधून वेळ काढत त्यांनी देवीची खणा नारळाने ओटी भरत दर्शन घेतले. विधानसभेत मनसेच्या उमेदवारांना भरघोस यश दे, असे मनोमन साकडे घातले.

यावेळी त्यांच्या समवेत मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर, मनविसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, मनसे लोणावळा शहराध्यक्ष भारत चिकणे, विजय भानुसघरे, अविनाश जांभुळकर, संतोष खराडे, अनंता तिकोणे, संतोष मोधळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.