Lonavala Monsoon Update: लोणावळ्यात 24 तासात 110 मिमी पाऊस; संततधार कायम

Lonavala Monsoon Update: 110 mm rain in 24 hours in Lonavala; Continues Raining

एमपीसी न्यूज – लोणावळा- खंडाळा परिसरात मागील 24 तासात 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार व जोर आज (रविवारी) देखील कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

मुंबई परिसरात पावसाने थैमान घातले असताना त्यांचा तडाखा लोणावळा- खंडाळा या घाटमाथ्यावरील शहरांना देखील बसला आहे. पावसाचे आगार असलेल्या मावळ तालुक्यात काल शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून पावसाची संततधार कायम आहे.

पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण देखील भरले असून डोंगर भागातून धबधबे वाहू लागले आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी वाढले आहे.

लोणावळा बाजार पेठ, नांगरगाव, तुंगार्ली, वलवण येथील काही सखल भागात पाणी साचू लागले आहे. पावसाची संततधार थांबत नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळी पर्यटनावर बंदी घातली आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पर्यटकांचा हिरेमोड झाला आहे. पर्यटनाच्या हंगामातच लॉकडाऊन असल्याने व्यापारी वर्ग, हॉटेल व्यावसायिक देखील हवालदिल झाले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.