Lonavala : तळेगावच्या युवकाचा लोहगड किल्ल्याजवळ खून

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील एका युवकाचा लोहगड किल्ला ते भाजे लेणी दरम्यान खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने सदर युवकाच्या मानेवर व पाठीवर वार करण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विनोद पवार (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे या मयत युवकाचे नाव आहे. काल गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या कुटुंबियांनी तळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. आज सकाळी हा मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ माजली असली तरी खुनामागील नेमके कारण अद्याप समजु शकलेले नाही. सदरचा मृतदेह हा शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले हे ह्या प्रकरणी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.