Lonavala : ‘मुस्लिम बांधवांनी रमजानचे नमाज पठण घरातच करावे’

एमपीसी न्यूज : मुस्लिम बांधवांनी पुढिल आठवड्यापासून सुरू होणार्‍या रमजाम महिन्यामध्ये लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील मशीद व इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज तरावीह पठन, रोजा ईफ्तार व इतर धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन लोणावळा शहर सून्नि-मुस्लिम जमात तर्फे चेअरमन शफी अत्तार, व्हाईस चेअरमन रफिक शेख, ट्रस्टी हाजी पटेल शेख व हाजी मुश्ताक काठेवाडी यांनी समाजाला केले आहे.

कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात सर्वत्र लाॅकडाऊन व संचारबंदी करण्यात आली आहे. लोणावळा शहर व मावळ तालुक्यात सुदैवाने आजपर्यत कोरोना महामारीची लागण झालेली नाही. कोरोना संसर्ग टाळण्याकरता सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व जमात बांधवांनी नियमांचे पालन करत घरामध्येच नमाज पठण व धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.