Lonavala : अंगणवाडी ही शैक्षणिक जीवनाची पहिली पायरी – मोरारका

एमपीसी न्यूज- अंगणवाडी ही शैक्षणिक जीवनाची पहिली पायरी आहे. या प्राथमिक स्तरांवर मुलांचा शारिरीक व मानसिक विकास होणे महत्वाचे असल्याचे मत नारायणी नारी चेतना केंद्राचे विश्वस्त काशिप्रसाद मोरारका यांनी व्यक्त केले.

नारायणी सेवा संस्थानच्या श्री नारायण नारी चेतना केंद्राच्या वतीने 26 जानेवारी निमित्त लोणावळा परिसरातील 26 अंगणवाड्यांना तिनचाकी सायकलींसह दहा प्रकारची खेळणी भेट देण्यात आली. यावेळी संस्थानचे विश्वस्त मधुसूदन झुनझुनवाला, काशीप्रसाद मुरारका, जयप्रकाश बैरागरा, शामसुंदर पंसारी, परमेश्वर तुलसियान, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी उषा जाधव, अंगणवाडी समन्वयक अर्चना राही आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोरारका म्हणाले आजची मुले ही उद्याच्या भारताचे भविष्य आहे. अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया आहे. हा पाया मजबुत झाल्यास पुढे शिक्षणाची इमारत डोलात उभी राहणार आहे. याकरिता प्राथमिक पातळीवर मुलांच्या मनामध्ये अभ्यासाची, शाळेची व खेळाची आवड निर्माण करण्याकरिता नारायणी नारी चेतना केंद्र काम करत असल्याचे सांगितले.

अंगणवाडी प्रकल्प प्रमुख उषा जाधव म्हणाल्या, “अंगणवाड्यांना निधीची कमतरता असल्याने मुलांना भौतिक सुविधा पुरविताना अडचणी येतात. नारायणी संस्थान कडून वेळोवेळी मुलांना ह्या भौतिक सुविधा पुरविल्या जात असल्याने मुलांमध्ये अंगणवाडीची गोडी निर्माण होऊ लागली आहे” मुलांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना देखिल ब्लँकेट वाटप यावेळी करण्यात आले. नानाविध प्रकारची खेळणी मिळाल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता.

HB_POST_END_FTR-A2
You might also like