Lonavala : नवले महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये खासगी अथवा शासकीय नोकऱ्यांमध्ये नवोदितांना संधी मिळण्याकरिता त्यांच्यात कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड सायन्समध्ये तृतीय वर्षातील सर्व बी.बी.ए, बी.सी.ए, बी.कॉम, व एम. कॉम. विद्यार्थ्यांसाठी 4 दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेकरिता विशेष कार्यकुशलतेचे ट्रेनिंग घेतलेले शिल्पा खुणे व प्रतिमा तळेकर या दोन प्रशिक्षकांनी महाविद्यालयांमधील एकूण 35 विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये बायोडाटा कसा लिहावा, आत्मविश्वास विकसित करणे, व्यवसायामधील आवश्यक संवाद साधणे, शिष्टाचाराच्या पद्धती, ड्रेस कोड, मुलाखतीची तयारी आदी गोष्टींचा समावेश होता. अशा प्रकारच्या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चित फायदा होईल असे मनोगत कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नितीन जोशी व प्रा. इक्बाल हवालदार यांनी विशेष प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.