Lonavala : पक्षविरोधी भूमिका घेणार्‍या नेत्यांच्या मागे ‘राष्ट्रवादी’चा कार्यकर्ता जाणार नाही -दीपक हुलावळे

कुसगाव वाकसई गटातून सुनील शेळकेंना मताधिक्य देणार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात भूमिका घेणार्‍या कोणत्याही नेत्याच्या मागे कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जाणार नाही. या गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना मोठे मताधिक्य आम्ही मिळवून देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांनी ‘एमपीसी न्यूज’ शी बोलताना सांगितले.

यावेळी हुलावळे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब नेवाळे यांनी पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून नाराजी व्यक्त करत सर्व पदांचे राजीनामे दिले होते. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कुसगाव वाकसई गटातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नेवाळे यांना मनधरणा करण्याकरिता त्यांच्याकडे गेलो होतो. मात्र, नेवाळे यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने सर्व कार्यकर्ते भ्रमनिरास झाले.

नाणे मावळातील तसेच कुसगाव वाकसई गटातील राष्ट्रवादीचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे जिल्हा परिषद सदस्या कुसुम ज्ञानेश्वर काशिकर, पंचायत समिती सदस्य महादु उघडे, सदस्या राजश्री संतोष राऊत, माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, माजी जिल्हा परिषद सदस्या गंगाताई कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बालगुडे, राजूशेठ देवकर, सुरेश कडू, किरण हुलावळे, अमोल केदारी, बाळासाहेब येवले, संतोष राऊत जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष भगवान दादा डफळ, तानाजी पडवळ यांच्यासह सर्व कुसगाव – वाकसई जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती हुलावळे यांनी दिली.

यावेळी हुलावळे म्हणाले, कुसगाव वाकसई गट हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असून तो मजबूत ठेवणार असून पक्ष विरोधी भूमिका घेणार्‍या नेत्याच्या मागे येथील कोणताही कार्यकर्ता जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.