Lonavala : ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाने मावळच्या ग्रामीण भागाचा विश्वासघात केला -बाळासाहेब नेवाळे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळच्या ग्रामीण भागाचा विश्वासघात केला आहे, असा संतापजनक हल्लाबोल राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब नेवाळे यांनी केला आहे.

गेली 20 वर्षे पक्ष सांगेल ते काम करत ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम केले असे असताना ग्रामीण अस्मितेची अवहेलना करत भाजपातून आयात केलेल्या माणसाला दिलेली उमेदवारी आम्ही मान्य करणार नाही. मी उमेदवारी अर्ज भरणार नसलो तरी ग्रामीण भागाची ताकद काय आहे? हे दाखवून देणार आहे.

सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला असून येत्या 9 आँक्टोबर रोजी कार्यकर्ता मेळावा घेत पुढील राजकीय निर्णय जाहिर केला जाईल असे सांगितले.

नेवाळे यांच्या समर्थनार्थ आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर जोरदार हल्ला चढविला. ज्यांनी अजित पवार यांच्या मुलाला पाडला त्यांना अजितदादांनी उमेदवारी दिली. राष्ट्रवादीत कोणी लायक उमेदवार नव्हता का? ज्यांच्या चार पिड्यांच्या रक्तांत भाजपा व संघ आहे ते राष्ट्रवादीचे होणार आहेत का? याचा विचार नेतृत्वाने करायला हवा होता. ग्रामीण नेतृत्वाला डावलण्याचे कारण काय? याची उत्तरं राष्ट्रवादीला द्यावी लागतील, असा संताप यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like