Lonavala News: लोणावळ्यात संततधार सुरुच, शहरात 24 तासांत 101 मिमी पाऊस

Lonavala News: 101 mm rain in 24 hours in Lonavala पावसाची संततधार आज देखील कायम आहे. पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत.

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात गुरुवारी 24 तासांत 101 मिमी (3.98 इंच) इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. लोणावळा शहर‍ात गुरुवारी दिवसभर व रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती. मागील काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाला आता लोणावळ्यात सुरुवात झाली आहे.

शहरात आज (दि.14) सकाळी सात वाजेपर्यत यावर्षीचा एकूण 2615 मिमी (102.95 इंच) पाऊस नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत 5008 मिमी (197.17 इंच) इतका पाऊस लोणावळ्यात झाला होता.

पावसाची संततधार आज देखील कायम आहे. पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.