Lonavala News: लोणावळा शहरात मागील 24 तासांत तब्बल 192 मिमी पाऊस

Lonavala News: 192 mm rain in last 24 hours in Lonavala city मागील पंधरा दिवसापासून लोणावळा शहरात पावसाची संततधार कायम आहे. त्यातच अधूनमधून जोरदार सरी पडत आहेत.

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात मागील 24 तासांत 192 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. मागील दोन आठवड्यांपासून लोणावळा शहर व परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने पावसाने सरासरी भरून काढली आहे.

शहरात शुक्रवारी (दि.21) सकाळी सात वाजेपर्यत यावर्षीचा एकूण 3299 मिमी पाऊस नोंदविण्यात आला. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यत 5110 मिमी (201.18 इंच) इतका पाऊस लोणावळा शहरात झाला होता.

मागील पंधरा दिवसापासून लोणावळा शहरात पावसाची संततधार कायम आहे. त्यातच अधूनमधून जोरदार सरी पडत आहेत. यावर्षी पर्यटनाल‍ा बंदी आहे. मात्र जोरदार पावसामुळे लोणावळा व खंडाळा परिसरातील धबधबे भरून वाहू लागले आहेत. भुशी धरणाच्या मोकळ्या पायर्‍यांवरून पाणी वाहत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.