Lonavala Crime News : जुगार खेळणार्‍या 9 जणांवर गुन्हा दाखल; 1 लाख 31 हजारांचा मुद्देमाल ताब्यात

एमपीसी न्यूज – मुंबईहून जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या 9 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून जुगारीच्या साहित्यांसह 1 लाख 31 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

पोलीस शिपाई विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात त्या सर्वांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) भा.द.वि कायदा कलम 188, 269 सह साथरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशिष चंपालाल संदेशा (वय 39 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मुंबई), पुष्पराज विमलचंद राठोड (वय 49 वर्षे, व्यवसाय ज्वेलर्स दुकान रा. अरहित टॉवर, टी.बी. कदम मार्ग मुंबई), अमित कांतीलाल जैन (वय 45 वर्षे व्यवसाय कपड्याचे व्यवसाय रा. मेस टॉवर जयहिंद टॉकीज जवळ लालबाग मुंबई), हसमुख छगनलाल जैन (वय 47 वर्षे व्यवसाय कपडयाचा व्यवसाय रा. न्यू पटेल भवन मरीन स्ट्रिट, मुंबई), कल्पेश प्रकाशचंद जैन (वय 45 वर्षे व्यवसाय लाईट चा व्यवसाय रा. नेहरू टॉवर लालबाग मुंबई), अनिल हिरचंद जैन (वय 47 वर्षे व्यवसाय काँसमेटीक्स रा. नाना माणिक बिल्डींग विठ्ठलवाडी मुंबई), सुमित रूपचंद जैन (वय 38 वर्षे व्यवसाय कपडयाचे व्यवसाय रा. चिंचपोकळी मुंबई), प्रविणकुमार संपतराज जैन (वय 46 वर्षे व्यवसाय डायमंड व्यवसाय रा. नेहरू टॉवर चिंचपोकळी, मुंबई), जयेश बाबुलाल जैन (वय 45 वर्षे व्यवसाय मेडीकल दुकान रा. नेहरू टॉवर चिंचपोकळी मुंबई) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोल्ड व्हॅली परिसरातील काच बंगल्याशेजारी स्वप्नलोक सोसायटीमध्ये वरील सर्वजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी याठिकाणी तपासणी केली असता वरील सर्वजण विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आले. त्याठिकाणी जुगारीचे साहित्य व 1 लाख 31 हजार 400 रुपयांची रोकड मिळून आली. मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पारित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे याठिकाणी जुगार खेळली जात असल्याने वरील सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उंडे हे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.