23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Lonavala News : कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या दोन दुकानांना 20 हजारांचा दंड

spot_img
spot_img

एमपीसीन्यूज : कोरोना साथरोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी आज सोमवारी (19 जुलै) दोन दुकानांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड केला, तर दोन दुकान मालकांवर भादंवी कलम 188, 269 व साथरोग नियंत्रण कायदा कलम 1897 चे कलम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी यांनी अस्थापनांसाठी काही निर्बंध लागू केलेले आहेत. असे असताना ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी मनोज रामशंकर जयस्वाल यांचे रामशंकर चना डेपो व राकेश झवेरचंद पोरवाल यांचे पोरवाल कलेक्शन या दोन्ही दुकानांना प्रत्येकी 10 हजार प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे.

सोबतच रोहित रामदास भालेसाईन यांचे मोरे वडेवाले व शांताराम गणपत मोरे यांचे आकाश टी स्टाॅल या दोघांवर दुकाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवल्याप्रकरणी भादंवी कलम 188, 269 व साथरोग नियंत्रण कायदा कलम 1897 चे कलम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

spot_img
Latest news
Related news